Sushilkumar Shinde On Praniti Shinde : लेकीच्या विजयानंतर वडिलांची भावनिक प्रतिक्रिया Solapur

Sushilkumar Shinde On Praniti Shinde :

Praniti shinde on Bjp : लोकसभा निवडणुकीत (solapur loksabha) भाजपचा सोलापुरात दंगल घडवण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप सोलापूर लोकसभेच्या नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी केलाय. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रणिती शिंदेंनी प्रथमच मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी भाजपवर गंभीर टीका केलीय. 400 पार चा नारा सुरु असताना इथल्या सर्वसामान्य लोकांनी मला हिंमत दिली, मला लढण्याची प्रेरणा दिल्याचे शिंदे म्हणाल्या. सोलापूरची (Solapur) पहिली महिला खासदार होण्याचा मान मला मिळाला, हे केवळ इथल्या जनतेमुळे शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या.

लोकांचे ऋण मी कधीच विसरु शकणार नाही 

प्रचाराच्यावेळी 43 डिग्री तापमान होतं. मात्र, लोकं विशेषतः शेतकऱ्यांनी बाहेर येऊन आपला भाजप विरोधात असलेला रोष व्यक्त केला. 400 पार चा नारा सुरु असताना इथल्या सर्वसामान्य लोकांनी मला हिंमत दिली. मला लढण्याची प्रेरणा दिल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या. सोलापूरकरांच्या अनेक आशा माझ्याकडून आहेत. अनेक आव्हानं आता माझ्यासमोर असणार आहेत. तीन वेळा आमदार आणि आता खासदार झाले आहे. लोकांचे ऋण मी कधीच विसरु शकणार नाही असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. ज्यांनी मतदान केलं आणि ज्यांनी नाही केलं अशा सर्वांसाठीच काम करणं हेच माझे ध्येय असल्याचे त्या म्हणाल्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola