Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

Continues below advertisement

Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

Rohit Pawar and Suraj Chavan: रोहित पवार यांच्या टीमकडून गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच्यापुढे जर बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल. आमच्या पक्षात कोणी चुकत असेल तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकार सुनेत्रा वहिनींना (Sunetra Pawar) आहे. सध्या जे काही राजकारण केले जात आहे ते योग्य नाही, अशी टीका अजितदादा गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी केली. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर प्रचंड आगपाखड केली. (Maharashtra Politics News)

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नेत्यांना बदनाम करण्यासाठी तुतारी गटाकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. तुतारी गटाचं जेवढं स्वत:च्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष आमच्या पक्षावर आहे. सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल, यासाठी प्रयत्न केला जात आहे. तुमचे मोहोळचे आमदार कोणाच्या बॅनरखाली काम करत आहेत ते बघा आणि नंतर बोला. आम्हाला माहिती मिळाली की, रोहितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आणि फूट पाडण्यासाठी एका एजन्सीला 5 कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना  खोटे आरोप करण्यासाठी नेमणुका केल्या आहेत. हे पदाधिकारी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे आणि फूट पाडण्यासाठी काम करत असल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केला.

त्यांच्याच एका प्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन अशी बातमी सोडली की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानातून काही फ्रंटल वगळण्यात आले. त्यामध्ये ओबीसी, सामाजिक आणि इतर सेलचा समावेश असेल. प्रसारमाध्यमांना अर्धवट माहिती देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसची जी घटना आहे, त्यामध्ये पक्ष स्थापन झाल्यापासून फ्रंटलचे पाच विभाग आहे आणि सेल आपल्याला वाढवता येतात. फ्रंटलमध्ये एक येते फादर बॉडी, महिला काँग्रेस, युवकची बॉडी, विद्यार्थी आणि सेवादल हे फ्रंटलचे भाग आहेत. हाच कागद दाखवून महाराष्ट्राची दिशाभूल करण्यात आली. त्यांनी असं सांगितलं , सेवादल, अल्पसंख्याक, ओबीसी सेल, सामाजिक न्याय हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आले. हे सगळे घटक फ्रंटल सेलचा भाग कधीच नव्हते, असे सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola