#Maratha उद्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात निकालाची शक्यता,सकाळी साडेदहा वाजता सुनावणी
Continues below advertisement
सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टाने योग्य ठरवला होता. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने मराठा आरक्षणावर सुनावणी पार पडली. 1992 मधील इंदिरा साहनी खटल्याप्रकरणी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे की नाही आणि इंदिरा साहनी खटल्याचा निर्णय मोठ्या घटनापीठाकडे पाठवण्याची गरज आहे की नाही, याचं परीक्षण करणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra State Government New Delhi Special Report Maratha Aarakshan