Sunil Kedar Case : सुनील केदारांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी ABP Majha
Sunil Kedar : सुनील केदारांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, अधिकारात नसताना वकिलांनी अपील प्रत मिळवून उत्तर दाखल केलं
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसन नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. परंतु अधिकार नसताना दोन कनिष्ठ सरकारी वकिलांनी अपील प्रत मिळवून उत्तर दाखल केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अजय माहूरकर आणि दीपिका गवळी या दोन वकिलांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. काल न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवादाचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे आज जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल येणं अपेक्षित आहे.