Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

Continues below advertisement

बारामती : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी नाव न घेता बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगताप यांना थेट इशारा दिला आहे. आपल्या सर्वांचे संबंध चांगले आहेत नंतर कोण जवळ येणार अशा अनेक अफवा आहेत. कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर एवढे लक्षात ठेवा, दादा खूप मोठ्या मनाचे होते दादांसारखी मी नाही, असा थेट इशाराच सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) नाव न घेता पुरुषोत्तम जगताप यांना दिला आहे. मागे अनेक चुकीच्या अफवा ऐकायला येत असून कारखान्याचा अध्यक्ष हा सर्वसमावेशक असेल सर्वांच्या मर्जीनुसार अध्यक्षाची निवड केली जाईल. अध्यक्ष अगोदर ठरवलेला नाही निवडणुकीच्या निकालानंतर कोण अध्यक्ष ते ठरवू असंही सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) म्हणाल्या आहेत.

Sunetra Pawar: नेमकं काय म्हणाल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार?

"सगळ्यांचे संबंध अगदी चांगले आहेत. मनात कसं दुखवून नंतर काय होणार, नंतर कोण जवळ येणार, अनेक अफवा आहेत. कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका. एकदा बाहेर ते कायमचं बाहेर, एवढं लक्षात ठेवा. दादा खूप मोठ्या मनाचे होते. दादांसारखी मी नाही. एवढं लक्षात ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. अनेक अफवा, चुकीच्या अफवा ऐकायला येतात. चेअरमन हा सर्वसमावेशकच असेल. सर्वांच्या मर्जीनुसारच होईल. कोणी कुठलं कोणी आधीच ठरवलेलं नाही. निवडणूक होऊ द्या, नंतर बघू चेअरमनचं कोण असेल तो. अनेक अफवा येतात. कुठल्याही अफवा असतील तर त्या अफवाच आहेत. कसलीही गोष्ट खरी नाही, हे लक्षात ठेवा, असंही पुढे सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola