Sujay Vikhe on Sai Temple : साई मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन करा, विखेंची मागणी
Continues below advertisement
साई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे रजिस्ट्रेशन बंधनकारक असावे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी केली आहे. तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणेच शिर्डीच्या साई मंदिरातही हा नियम लागू व्हावा, असे सुजय विखे म्हणाले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक भाविकाचे रजिस्ट्रेशन आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. साई संस्थान कर्मचारी सोसायटीच्या दिवाळी शिधावाटपाच्या कार्यक्रमात त्यांनी संस्थानच्या अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली. काही दिवसांपूर्वी मंदिर प्रमुखावर एका महिला भाविकाकडून भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी तक्रार दाखल होऊनही संबंधित महिलेचा शोध लागलेला नाही. या घटनेचा दाखला देत सुजय विखे यांनी रजिस्ट्रेशनची गरज अधोरेखित केली. "संस्थानमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे. नाहीतर यापुढे कोणी फॉर्म ठेवून गेला, आपण शोधात कशी? सीसीटीव्हीवर तो दिसतोय, पण आपण कोण हेच आपल्याला सापडत नाही हे मान्य करताच येणे गरजेचे आहे," असे विखे म्हणाले. कामाख्या मंदिरासारख्या ठिकाणीही रजिस्ट्रेशन होते, असे त्यांनी नमूद केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement