Uddhav Thackeray Deepotsav : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कातील दिपोत्सवाला उपस्थित राहणार?
Continues below advertisement
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले असतानाच, दुसरीकडे एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. 'या सरकारने एसटीच्या कामगाराला एकही पैसा दिलेला नाही, देतायत ते सवलत मूल्य देतायत', असा गंभीर आरोप एसटी कामगार संघटनेने केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात महापालिका प्रशासनाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र मोर्चा काढणार आहेत. तर दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी थकबाकीच्या मागणीसाठी आजपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे, जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, १५ ऑक्टोबरपासून सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले प्रवासी असण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement