Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

Continues below advertisement

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी 

राष्ट्रपित्याची प्रसिद्ध "गांधी टोपी" आज फक्त काही राजकारण्यांच्या डोक्यावर प्रातिनिधिक स्वरूपात दिसून येते... मात्र, नागपूर जिल्ह्यातील एका उर्दू शाळेने गेले 90 वर्षांपासून "गांधी टोपी" ची परंपरा मोठ्या अभिमानाने जपली आहे..
शाळेतील प्रत्येक विद्यार्थी (सुमारे 1400 मुले) मोठ्या अभिमानाने राष्ट्रपित्यांची ही टोपी शाळेच्या गणवेशाचा अविभाज्य भाग म्हणून रोज घालतो आणि दिवसभर डोक्यावर मिरवतो... स्वातंत्र्यदिनी गांधी विचारांचा वारसा अनोख्या पद्धतीने जपणाऱ्या कामठीतील "एम एम रब्बानी" शाळेवर एबीपी माझाची ही विशेष बातमी....
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ही गांधी टोपी पाहून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केलेला प्रपंच समजू नका... नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील "एम एम रब्बानी" शाळेतील शेकडो विद्यार्थी गांधी विचारांचा खास वारसा अनोख्या पद्धतीने रोज आपल्या डोक्यावर मिरवतात.. 1932 मध्ये स्थापन झालेल्या या शाळेने 1937 मध्ये गणवेशाचा स्वीकार केला, आणि तेव्हापासून आजवर शाळेतील लाखो विद्यार्थ्यांनी ( गेल्या 90 वर्षात शिकून गेलेल्या) रोज न विसरता खादीची गांधी टोपी घातली आहे... कारण शाळेने गेले नऊ दशक शालेय गणवेशात राष्ट्रपितांची गांधी टोपी बंधनकारक ठेवली आहे.. सकाळची प्रार्थना असो.... किंवा वर्गात शिकणे असो... किंवा दुपारची खेळण्याची वेळ असो... किंवा प्रयोगशाळेतील वैज्ञानिक प्रयोगाची वेळ असो... प्रत्येक वेळी रब्बानी शाळेचे विद्यार्थी गांधी टोपीतच दिसतात..



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola