Special Report Ambi Valley | लोणावळ्यातील अॅम्बी व्हॅलीवर ईडीची टाच, आलिशान अॅम्बी व्हॅली कुणाची?

Special Report Ambi Valley | लोणावळ्यातील अॅम्बी व्हॅलीवर ईडीची टाच, आलिशान अॅम्बी व्हॅली कुणाची?

यानंतर पुढची बातमी आहे लोणावळ्यातून एमबी व्हॅलीच्या 10 हजार एकर जागेपैकी 707 एकर जागेवर टाच आणण्याचा निर्णय एडी ने घेतला. सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहान पुणे जिल्ह्यातील लोणावळ्या जवळ उभारलेली एमबी व्हॅली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि मनोरंजनाच्या साधनांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र राहिली. मात्र सहारा समूह गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ न शकल्यान एमबी वॅलीची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे 1600 कोटी रुपये परत करण्याचा दावा करण्यात येतोय, आता देशातील कोणता उद्योगपती एमबी वॅलीचा मालक होतो याची मात्र मोठी उत्सुकता आहे. एमबी व्हॅली एकेकाळी पृथ्वीवरील मानव निर्मित स्वर्ग म्हणून याच एमबी व्हॅलीची ओळख होती. 2006 साली सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहाने पुण्याच्या मुळशीत तब्बल दहा हजार एकरात उभं केलेलं हे हिल स्टेशन. सहारा समूहाचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून ही एमबी व्हॅली ओळखली गेली. सहारा समूह जेव्हा रियल इस्टेट, चीट फंड, पॅराबँकिंग, हॉस्पिटलिटी, इंडियन क्रिकेट टीमची स्पॉन्सरशिप अशा... एक ना अनेक क्षेत्रांमध्ये काम करत होता, यशाच्या शिखरावरती होता, तेव्हा देखील चर्चा असायची ती या एमबी व्हॅलीची, ही एमबी व्हॅली सुंदर तर आहेच, त्याचबरोबर आत्तापर्यंत एक इकॉनॉमिक मॉडेल म्हणून ती कमालेची यशस्वी देखील ठरली आहे. लोणावळ्यापासून 23 किलोमीटर अंतरावर 10,600 एकरात एमबी व्हॅलीची सहारा समूहाकडून उभारणी करण्यात आली. भारतातील पहिली मानव निर्मित हिल सिटी म्हणून अनेक सिनेकलाकार, क्रिकेट पटू यांच्यासह सेलिब्रिटींनी जाहिरात केल्याने एमबी व्हॅलेची मोठी चर्चा झाली. पण 2009 साली सेबीन सुब्रतो रॉय आणि त्यांच्या सहारा समूहाची चौकशी सुरू केली आणि परिस्थिती झपाट्याने बदलली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola