Azaan On App : सोलापुरात भोंग्यांना पर्याय, मोबाईल अ‍ॅपवर ऐका अजान Solapur

Continues below advertisement
सोलापूरमधील (Solapur) ध्वनी प्रदूषणाच्या (Noise Pollution) पार्श्वभूमीवर शहरातील धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवल्यानंतर, बडी मशीद ट्रस्टने (Badi Masjid Trust) तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. हा उपक्रम 'भोंग्यांशिवायसुद्धा श्रद्धेचा स्वर कसा जपता येतो, हे दाखविणारं एक उत्तम उदाहरण' मानलं जात आहे. सोलापूर पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर शहरातील २८९ मंदिरा आणि मशिदींसह सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे काढून टाकण्यात आले. त्यामुळे मुस्लीम समाजात अजान कशी ऐकायची हा प्रश्न निर्माण झाला होता. यावर उपाय म्हणून फॉरेस्ट परिसरातील बडी मशीद ट्रस्टने एक मोबाईल ऍप्लिकेशन तयार केले आहे. या ऍपद्वारे नागरिक कुठेही असले तरी मोबाईलवर थेट मशिदीतून लाईव्ह अजान ऐकू शकतात. मशिदींमध्ये लावलेले क्यूआर (QR) कोड स्कॅन करून वापरकर्ते ऍपशी जोडले जातात, जिथे त्यांना नमाज आणि अजानच्या वेळाही मिळतात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola