Solapur Politics: राष्ट्रवादी-काँग्रेसला मोठा धक्का! 4 माजी आमदार भाजपच्या वाटेवर, 'वर्षा'वर खलबतं

Continues below advertisement
सोलापूरच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून, चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजन पाटील, यशवंत माने, बबन शिंदे आणि काँग्रेसचे नेते दिलीप माने यांचा समावेश आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘या चारही माजी आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रात्री 'वर्षा' बंगल्यावर चर्चा झाली आहे’. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश होत असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे हे सध्या अमेरिकेत उपचाराधीन असले तरी, त्यांचे पुत्र रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. राजन पाटील आणि यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून, तर दिलीप माने हे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola