Solapur Rain : सोलापुरात पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात, बळीराजा चिंतेत
Continues below advertisement
सोलापूर शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने सोलापूरकर चिंतेत आहेत. गुरुवारच्या मध्यरात्री झालेल्या पावसामुळे सोलापूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, "जवळपास दोन ते तीन दिवस अशाच पाऊस राहील असा इशारा दिला जाईल." संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी Yellow Alert जारी करण्यात आला आहे. ग्रामीण भागातही पावसाचा मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे अजून सुरू झालेले नाहीत, त्यापूर्वीच पुन्हा मुसळधार पाऊस कोसळत आहे. दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement