BJP Infighting: 'कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्याला प्रवेश देणार?', Solapur मध्ये Dilip Mane यांच्यावरून भाजपमध्येच राडा
Continues below advertisement
सोलापूर भाजपमध्ये (Solapur BJP) काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे अंतर्गत वाद उफाळून आला आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या समर्थकांनी याविरोधात थेट पक्ष कार्यालयाबाहेरच आंदोलन केले आहे. 'कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्याला जर पक्ष प्रवेश देत असेल तर पक्षाची प्रतिमा जनतेसमोर काय होणार आहे, याचा विचार श्रेष्ठींनी केला पाहिजे', अशी संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या पुढाकाराने हे इनकमिंग होत असल्याने पक्षातील निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दुसरीकडे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तर माजी उपमहापौर राजेश काळे यांनी हे आंदोलन 'स्पॉन्सर्ड आणि स्टंटबाजी' असल्याचे म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement