Wagh Nakh Homecoming: London हून परतलेली 'वाघ नखं' आता Kolhapur मध्ये; शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण

Continues below advertisement
लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालอกจาก ३ वर्षांसाठी भारतात आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघ नखांचे प्रदर्शन आता कोल्हापुरात होत आहे. 'शिव शस्त्र शौर्य गाथा' नावाच्या या प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीत होणार आहे. 'ही वाघनखं २ मे २०२६ पर्यंत कोल्हापुरातील शिवभक्तांना पाहता येतील,' अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. साताऱ्यानंतर आता कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी (लक्ष्मी विलास पॅलेस) हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात वाघ नखांसोबतच इतर दुर्मिळ शिवकालीन शस्त्रांचाही समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि तमाम शिवभक्तांना या ऐतिहासिक ठेव्याला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola