Raigad Politics : रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेंची शिवसेना पुन्हा आमनेसामने

Continues below advertisement
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे गटाची शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून आमदार महेंद्र दळवी आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. 'मी मूठ उघडली तर तटकरे चेहरा दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाहीत', असा सज्जड इशारा शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंचे नाव न घेता दिला आहे. या टीकेला उत्तर देताना, येत्या निवडणुकीत 'दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल' आणि रोह्यातील जनता कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होईल, असे प्रत्युत्तर अनिकेत तटकरे यांनी दिले. या आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola