Shiv Sena Symbol Dispute | सुप्रीम कोर्टात आज सुनावणी: ठाकरे जिंकल्यास शिंदेंना BJP मध्ये जावं लागेल?

Continues below advertisement
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांमध्ये शिवसेनेचे नाव आणि पारंपरिक धनुष्यबाण चिन्हावरून तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले होते. निवडणूक आयोगाच्या या आदेशांना उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले होते. आता न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंकडून सविस्तर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती नोंगमिका कोतीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. हे प्रकरण सोळाव्या क्रमांकावर असल्याने आज सुनावणी निश्चित आहे, परंतु ती पूर्ण होईल का याबाबत शंका आहे, असे अड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या आणखी एका प्रकरणाची सुनावणी असल्याने विलंब होऊ शकतो. या प्रकरणाचा निर्णय भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. 'ठाकरेंच्या बाजूनं निकाल लागला तर शिंदेंना भाजपसारख्या इतर पक्षात जावं लागेल' असे सरोदे यांनी नमूद केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola