Voter List Row: '20 वर्षांपासून दुहेरी मतदार', आमदार Sanjay Gaikwad यांचा सरकारला घरचा आहेर.
Continues below advertisement
महायुती (Mahayuti) सरकारमधील शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दुबार आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'माझ्या मतदारसंघामध्ये वीस वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुहेरी मतदार आहेत', असा खळबळजनक दावा गायकवाड यांनी केला. देशभरात बोगस मतदारयाद्यांवरून (Bogus Voter Lists) वाद पेटलेला असताना, सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच केलेल्या या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी केवळ दुबार मतदारच नव्हे, तर बोगस मतदानाच्या (Bogus Voting) प्रकरणाकडेही लक्ष वेधले आहे. या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement