Shiv Jayanti Special Agra : शिवजयंतीनिमित्त आग्रा किल्ल्यात रंगणार शिवरायांची शौर्यगाथा

आज शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेमध्ये आग्रा शहराचं महत्त्व प्रचंड आहे. याच आग्रा शहरातील किल्ल्यात आज दिमाखदार सोहळा पार पडतोय. आग्रा किल्ल्याच्या दिवान-ए-आममध्ये शिवरायांची शौर्यगाथा सादर केली जाणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनां या सोहळ्याचं आयोजन केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola