Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीला अजूनही मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच

Continues below advertisement
अभिनेत्री Shilpa Shetty आणि तिचा पती Raj Kundra यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही. या प्रकरणी दोघांचीही चौकशी सुरू आहे. शिल्पा शेट्टीला 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान कोलंबो येथे एका कार्यक्रमासाठी जायचे होते. यासाठी तिने परदेश प्रवासाची परवानगी मागितली होती, परंतु उच्च न्यायालयाने ती नाकारली. न्यायालयाने स्पष्ट केले की, "आधी साठ कोटी रुपये कोर्टाकडे डिपॉझिट करा आणि मग आम्ही परदेश प्रवासाला परवानगी देण्याबद्दल विचार करू." या निर्णयामुळे Shilpa Shetty आणि Raj Kundra यांना परदेशात जाण्यासाठी 60 कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola