Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट

Continues below advertisement

Praful Patel and Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात सध्या सुरु असलेल्या नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल (Praful Patel) या दोघांना पक्षातून साईडलाईन करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल पटेल यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा होती. तर सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचाही प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख टाळण्यात आला होता. सुनेत्रा पवार यांची या दोन्ही नेत्यांवर खप्पामर्जी झाल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात रंगली होती. यानंतर सुनील तटकरे यांनी अचानक 12 मे रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. मात्र, त्याचदिवशी प्रफुल पटेल हेदेखील शरद पवार यांना भेटून गेले होते, अशी नवीन माहिती आता समोर येत आहे. (Maharashtra Politics News)

सुनील तटकरे हे 12 मे रोजी रात्री शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. तटकरेंच्या या भेटीआधीच प्रफुल पटेल हेदेखील शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते, असी माहिती आता उजेडात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या संपूर्ण नाराजीनाट्याबाबत प्रफुल पटेल हे आतापर्यंत मौन बाळगून होते. मात्र, त्यांनीही 12 मे रोजी शरद पवार यांची भेट घेतल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काहीतरी वेगळ्याच हालचाली सुरु आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 12 मे रोजी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही आसाममधील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी गुवाहाटी येथे गेले होते.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola