Ajit pawar Sharad Pawar Together : शरद पवार-अजित पवार पुन्हा एकत्र, माणिकराव कोकाटे एका फ्रेममध्ये
Sharad Pawar -Ajit Pawar : पुण्यातील साखर संकुलात कार्यक्रम, शरद पवार-अजित पवार शेजारीच बसले
शरद पवार आणि अजित पवारआज पुन्हा एकत्र आले. पुण्यात साखर संकुल येथे कृषी क्षेत्रात AI च्या वापराबाबत बैठकीला दोन्ही पवार उपस्थित आहेत. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ही आहेत.
हे ही वाचा
बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव (Shegaon) तालुक्यातील केस गळती प्रकरणाला (Buldhana Hair Loss) आता गंभीर वळण लागलंय. केस गळती झालेल्या रुग्णांची नखं गळती सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचे वृत्त 'एबीपी माझा' ने लावून धरले होते. अशातच आता 'माझा'च्या बातमीचा मोठा इंपॅक्ट झाल्याचे समोर आले असून या प्रकरणाची दखल आता केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे.
केस गळती झालेल्या रुगानांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली नखं गळून पडत आहे. आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या नखं गळती प्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण दिसून येत आहे. अशातच Abp माझा ने ही बातमी लावून धरल्यानंतर या बातमीची दखल घेत केंद्र सरकारच्या आकस्मित चिकित्सा राहत पथक बुलढाणा जिल्ह्यातील नखं गळती रुग्णांची तपासणी करण्यासाठी तात्काळ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता तरी पीडित रुग्णांना या आजारपासून मुक्तता मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.