Shaniwarwada Row: 'शनिवारवाडा Medha Kulkarni यांच्या पप्पांचा नाही', Rupali Thombre Patil आक्रमक
Continues below advertisement
पुण्यातील (Pune) शनिवारवाडा (Shaniwar Wada) परिसरात नमाज पठणानंतर झालेल्या वादावरून महायुतीमध्येच आता संघर्ष पेटला आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांच्यात थेट आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'शनिवारवाडा सर्व जाती धर्मांसाठी खुला आहे, तो मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा नाही,' अशा शब्दात रुपाली ठोंबरे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. ऐन दिवाळीत मेधा कुलकर्णी यांनी जाणीवपूर्वक दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठोंबरे पाटील यांनी केली आहे. 'ज्या ठिकाणी नमाज पठण झालं, तिथे मी मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणणार,' असेही त्यांनी सांगितले. 'सौभाग्याचं लेणं असलेल्या हिरव्या रंगाचा भाजपला इतका राग का?' असा सवाल करत, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement