Shaniwar Wada Row : शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा मेधा कुलकर्णींचा गंभीर आरोप
Continues below advertisement
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या (Shaniwar Wada) परिसरात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. सकल हिंदू समाज (Sakal Hindu Samaj) आणि पतित पावन संघटनेच्या (Patit Pavan Sanghatana) वतीने या घटनेचा निषेध करत 'शिववंदना' म्हणून वास्तूचे शुद्धीकरण करण्यात आले. यावर एका वक्त्याने म्हटले की, 'तुम्ही ज्या नाईलाजस्तव आपला स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे तुम्ही पुन्हा परत या, अन्यथा तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज पडा'. पुरातत्व विभागाकडून (Archaeological Department) व्हिडिओची शहानिशा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे संघटनांनी म्हटले आहे. शनिवार वाडा हे मराठा साम्राज्याचे (Maratha Empire) प्रतीक असून, अशा ऐतिहासिक ठिकाणी सार्वजनिक नमाज पठण करून ताबा घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement