एक्स्प्लोर
Mumbai Lawyer Heartattack: कोर्टात वैद्यकीय सुविधांचा अभाव, महिला वकिलाचा मृत्यू
मुंबईतील किल्ला कोर्टात (Killa Court) वरिष्ठ वकील मालती पवार (Advocate Malati Pawar) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे न्यायालयांमधील वैद्यकीय सुविधांच्या (Medical Facilities) अभावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 'माझी पत्नी कोसळल्यानंतर कोणीही तिला सीपीआर (CPR) दिला नाही, उलट काही जण तिचा व्हिडिओ शूट करत होते', असा गंभीर आरोप मालती पवार यांचे पती रमेश पवार यांनी केला आहे. गुरुवारी दुपारी बार रूममध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर मालती पवार कोसळल्या. मात्र, वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या पतीने केला. या प्रकरणानंतर मुंबईतील सर्व न्यायालयांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रिकेट
व्यापार-उद्योग
पुणे
Advertisement
Advertisement


















