Pune Security Scare: संरक्षण मंत्री Rajnath Singh आणि CM Fadnavis यांच्या कार्यक्रमात साप, मोठी खळबळ!
Continues below advertisement
पुण्यातील किवळये येथील सिंबायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात मोठी खळबळ उडाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमापूर्वी व्यासपीठाखाली एक साप आढळून आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'सिंबायोसिसने स्किल डेव्हलपमेंटमध्ये मोठे पाऊल टाकले आहे, पण इथे एक स्किल मिसिंग आहे आणि ते म्हणजे आनंदी राहण्याचे.' या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होते. राजनाथ सिंह आणि फडणवीस यांच्या आगमनाच्या काही मिनिटे आधी हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. नंतर सर्पमित्रांना बोलावून सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आले आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement