Maratha Reservation Row: '१३ आत्महत्या झाल्या, डिसेंबरमध्ये निवडणुका', सर्वोच्च न्यायालयात OBC संघटनेचा युक्तिवाद
Continues below advertisement
मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भात (Maratha-Kunbi Reservation) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्या ओबीसी वेल्फेअर असोसिएशनला (OBC Welfare Association) अंशतः दिलासा मिळाला आहे. 'या संदर्भामध्ये तेरा सुसाइड झालेले आहेत, आणि लोकल बॉडीजच्या इलेक्शन डिसेंबरमध्ये ड्यू आहेत,' असा युक्तिवाद करत याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी वकील मंगेश ससाणे (Mangesh Sasane) यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला लवकर सुनावणीचे निर्देश देण्यास नकार दिला असला तरी, ओबीसी संघटनेची याचिका मुख्य प्रकरणासोबत ऐकून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत या याचिकेचाही समावेश केला जाईल. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात वाटा दिला जात असल्याचा आरोप करत याला आव्हान देणारी याचिका ओबीसी संघटनेने दाखल केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement