Satej Patil on Vidhan Sabha : विधानसभा निवडणुकीतही मविआची सत्ता यावी ही जनतेची इच्छा : सतेज पाटील
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSatej Patil on Vidhan Sabha : विधानसभा निवडणुकीतही मविआची सत्ता यावी ही जनतेची इच्छा : सतेज पाटील
ही बातमी पण वाचा
ST Bus Strike : आर्थिक न्याय्य मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व संघटनांचा एल्गार; आषाढी एकादशी दिवशीच संपाचा इशारा
ST Bus Strike : मुंबई : आषाढी एकादशीच्या (Aashadhi Ekadashi) दिवशीच एसटी कामगारांनी (ST Employee) संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारचं टेन्शन वाढण्याची चिन्ह आहेत. आपल्या आर्थिक न्याय्य मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व संघटनांनी एल्गार पुकारला आहे. पुढच्या महिन्यात 9 जुलै आणि 10 जुलै रोजी विधीमंडळाच्या अधिवेशनावर आझाड मैदान मुंबई येथे धरणं आंदोलनाचा इशारा एसटी कामगारांनी दिला आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास 9 ऑगस्ट 2024 क्रांती दिनापासून राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच, 4 जुलै रोजी एसटी को. ऑप. बँकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात सहकार आयुक्त पुणे आणि जिल्हाधीकारी पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहितीही सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य या एसटी कामगारांच्या संघटनेनं दिली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्या बहुतांश संघटनांनी एकत्रित लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आजच राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रशासनाला आंदोलनाची नोटीस बजावणार आहे.