Satara Doctor case : राजकीय-पोलीसांच्या दबावामुळे बहिणीने आत्महत्या केली, कुटुंबीयांचा आरोप

Continues below advertisement
फलटणमधील (Phaltan) वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली असून, त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस आणि राजकीय दबावाचे गंभीर आरोप केले आहेत. 'माझ्या मरण्याचे कारण PSI गणेश बदने आहे, त्याने माझा चारवेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला,' असं डॉ. मुंडे यांनी मृत्यूपूर्वी हातावर लिहिल्याचे उघड झाले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून सातत्याने दबाव आणला जात होता, असा आरोप डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करेन, असा इशारा डॉ. मुंडे यांनी यापूर्वी दिला होता आणि दोन महिन्यांपूर्वी पोलीस उपअधीक्षकांकडे लेखी तक्रारही दिली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, हातावरील सुसाईड नोट हा महत्त्वाचा पुरावा मानून तपास सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola