एक्स्प्लोर
Satara Doctor case : सातारा महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणावर राहुल गांधींचा गंभीर आरोप
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'ही केवळ आत्महत्या नाहीये तर हत्या आहे,' असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी X पोस्टद्वारे केला आहे. बलात्कार आणि छळाला कंटाळून एका डॉक्टर मुलीवर आत्महत्या करण्याची वेळ येणं हे सुसंस्कृत समाजाला हादरवणारं आहे, असंही ते म्हणाले. भाजपशी संबंधित व्यक्तींनी तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. राहुल गांधी माहिती न घेता बोलतात आणि अशा संवेदनशील घटनांवर राजकारण करतात, हे दुर्दैवी आहे, असे फडणवीस म्हणाले. पीडित डॉक्टरने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे प्रकरण स्पष्ट झाले असून कुणालाही सोडले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
Advertisement
Advertisement



















