एक्स्प्लोर
Satara Doctor Case: 'आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे', पीडित डॉक्टरच्या कुटुंबियांचा आक्रोश
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत बनकर (Prashant Bankar) आणि पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (Gopal Badne) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 'माझ्या वैद्यकीय अधिकारी लेकराला न्याय मिळाला पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे', अशी मागणी करत पीडितेच्या वडिलांनी आपला संताप व्यक्त केला आहे. पीडित डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये बदनेने चार वेळा बलात्कार केल्याचा आणि बनकरने मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर आरोपी PSI गोपाळ बदने फरार झाला असून, प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी ड्युट्या लावून छळत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















