एक्स्प्लोर
Satara Case: फलटण डॉक्टर प्रकरणी हॉटेलमधील महिलेचा CCTV फुटेज अखेर समोर
सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला (Doctor Suicide Case) नवं वळण मिळालं आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 'डॉक्टर महिलेने आत्महत्येआधी संशयित आरोपी प्रशांत बनकरला (Prashant Bankar) लटकवलेल्या ओढणीचा फोटो पाठवला होता'. या धक्कादायक खुलाश्यामुळे प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. पोलिसांनी हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) जारी केले असून, यात डॉक्टर एकट्याच दिसत आहेत. या प्रकरणातील दुसरा आरोपी, निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने (Gopal Badane), याचा लपवून ठेवलेला मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. या मोबाईलमधून महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळण्याची शक्यता असल्याने आता तपासाला वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















