एक्स्प्लोर
Satara Doctor case : 'तुम्ही Beed चे असल्यामुळे Fitness Certificate देत नाही', खासदाराचा महिला डॉक्टरवर आरोप
सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये कार्यरत असलेल्या आणि मूळच्या बीडच्या असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने आणि इतरांवर छळ तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप आहेत. 'तुम्ही बीडचे असल्यामुळे फिटनेस सर्टिफिकेट देत नाही', असा आरोप एका खासदाराने केल्याचा दावा करत महिला डॉक्टरने वरिष्ठांकडे तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक अनिल महाडिक यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली होती, तर दुसरीकडे PSI गोपाल बदनेने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात येऊन धमकी दिल्याचाही आरोप आहे. या महिला डॉक्टरने वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही, ज्यामुळे तिला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. या संपूर्ण प्रकरणात पोलीस आणि राजकीय दबावामुळेच डॉक्टरने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























