RPI Protest : अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आरपीआयचंं आंदोलन
Continues below advertisement
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर RPI आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. सोनईमधील संजय वैरागर या तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. 'तरुणाला जातीय मानसिकतेतून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतंय,' असे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या संजय वैरागरवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चार जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. मात्र, सर्व आरोपींना अटक करून त्यांना कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement