Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटानं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर एकच चर्चा रंगली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची असताना चंद्रपूरमध्ये घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसकडून टीका करण्यात आली. मात्र, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 27 नगरसेवक चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आणूनही सत्ता आली नाही, याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे असेही ते म्हणाले. त्यामुळे तुम्हाला जे पाठिंबा देणार होते त्यांना सुद्धा वेगळा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाल. त्यामुळे शिवसेनेला दोष देण्यात काहीच अर्थ नसल्याचे ते म्हणाले.
मुंबईमध्ये आम्ही चर्चा करणार
दरम्यान, स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाऊ नका असं सांगण्यात आल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये गेल्यानंतर आम्ही या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. चंदपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटात सत्ता गमवावी लागली आहे. प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्येच संघर्ष पेटल्याने सत्ता गमवावी लागली आहे. हा दिल्लीपर्यंत पोहोचूनही दोघांच्या भूमिकेत कोणताच बदल झालेला नाही.


















