Navnath Ban Vs Sanjay Raut : सोनिया गांधींसमोर मुजरा करता, भाजपचा राऊतांवर हल्लाबोल

Continues below advertisement
शिवसेनेचे (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दिल्ली दौऱ्यावर केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. 'सोनिया गांधींसोबत (Sonia Gandhi) मुजरा करण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत, तुमच्या पक्षाचे नेते करतायत', असं प्रत्युत्तर भाजपचे (BJP) नवनाथ बन यांनी दिलं आहे. पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी जवळ आली की शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढतात, तिथे ते पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर रडगाणं गातात असा आरोप राऊत यांनी केला. यावर बन यांनी पलटवार करत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोनिया गांधींनी भेट नाकारल्याची आठवण करून दिली. 'तुमच्या नेत्याला तीन दिवस दिल्लीत ताटकळत बसावं लागलं होतं', असंही बन म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola