Maha Politics: 'राज ठाकरेंची इच्छा Congress ला सोबत घेण्याची', Sanjay Raut यांचा खळबळजनक दावा
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या आघडीची चर्चा सुरू झाली असून, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे', असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि काँग्रेसकडून मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काँग्रेसच्या बैठकीत स्वबळावर लढण्याची चर्चा झाल्याचे समोर आले आहे, तर मनसेने सावध भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी शिवसेना, मनसे, शरद पवार आणि डाव्या पक्षांसारख्या प्रत्येकाचे राज्यात एक महत्त्वाचे स्थान असल्याचेही म्हटले आहे, ज्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement