एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Maha Politics: 'मुंबई, ठाण्यात ठिकऱ्या फक्त गद्दारांच्याच उडतील', Raut यांचा Shinde यांना इशारा
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. राऊत यांनी ठाकरे आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. 'महाराष्ट्राची जनता, मुंबई ठाण्याची जनता ही ठिकऱ्या तुमच्याच गद्दारांच्याच उडवल्याशिवाय राहणार नाही,' असा थेट इशारा संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, कितीही लोक एकत्र आले तरी जनता त्यांच्या हातात 'लोकतिकिटच' देईल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. राऊत यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीत घोटाळा झाल्याचा आरोपही केला असून, निवडणूक आयोगाला सोडणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, महायुतीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















