Sanjay Raut On Voer List: 'निवडणूक यंत्रणा फ्रॉड, सर्वपक्षीय नेते निवडणूक आयोगाला धडकणार

Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे, शरद पवार, आणि राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेते निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. राऊत यांच्या मते, 'गेल्या दहा वर्षांपासून या देशातल्या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा म्हणजे फ्रॉड आणि फसवणूक झालेली आहे.' त्यांनी लोकसभा निवडणुकीत ४०-४५ जागा चोरल्याचा आणि नाशिकमध्ये साडेतीन लाख डुप्लिकेट मतदार असल्याचा दावा केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत VVPAT मशीन वापरण्यात येत नसल्याबद्दलही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या शिष्टमंडळात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात आले होते, परंतु ते चोर असल्याने येणार नाहीत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola