Maharashtra Politics: 'बच्चू कडूंना अर्बन नक्षल ठरवण्याचा प्रयत्न', संजय राऊत यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी, शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'त्याच दरम्यान बच्चू कडूंना अर्बन नक्षल ठरविण्याचा प्रयत्न केला जातोय' असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाची आठवण करून देत, जसे तेव्हा शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवण्यात आले, तसेच आता बच्चू कडूंच्या आंदोलनाला माओवाद्यांचा पैसा मिळत असल्याचा आरोप करून ते दडपण्याचा प्रयत्न सरकार करू शकते, असेही राऊत म्हणाले. सातबारा कोरा करण्याची मूळ मागणी उद्धव ठाकरेंचीच होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, महाविकास आघाडी आणि मनसे नेते निवडणूक आयोगाच्या विरोधात एकत्र आले असून, १ नोव्हेंबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाच्या नियोजनासाठी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक होणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement