Stamp Paper Challenge | MLA Sanjay Gaikwad vs Ex-MP Imtiaz Jaleel, आझाद मैदानात कुस्तीचं आव्हान!
आमदार संजय गायकवाड यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांना कुस्तीसाठी थेट आव्हान दिले आहे. आकाशवाणी आमदार निवासाच्या कँटीनमध्ये बॉक्सिंग केल्यानंतर आता गायकवाड यांनी जलील यांच्यासोबत कुस्ती खेळण्याची तयारी दर्शवली आहे. या कुस्तीसाठी त्यांनी स्टॅम्प पेपरवर एक करारनामा तयार केला आहे. या करारनाम्यात दोघांना काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी दोघांचीच राहील, असा उल्लेख आहे. हा करारनामा त्यांनी सहीसाठी जलील यांच्याकडे पाठवला असून, राज्याच्या पोलीस महासंचालकांना उद्देशून तयार केला आहे. मुंबईतील आमदार निवासात झालेल्या मारहाणीनंतर जलील यांनी बुलढाण्यात जाऊन गायकवाड यांच्यावर टीका केली होती. जलील यांनी 'जग भी तेरा, वक्त भी तेरा और दिन भी तेरा बोल कहाँ आना है' असे आव्हान दिले होते. यावर गायकवाड यांनी आझाद मैदानात येऊन लढण्याचे आव्हान दिले आहे. करारनाम्यानुसार, तारीख आणि वेळ जलील यांनी ठरवावी. दोघेही आपला पक्ष किंवा धर्म आणणार नाहीत. मित्र, नातेवाईक, समर्थक, कार्यकर्ते यांना मध्ये घेणार नाहीत. लढाई पोलिसांच्या साक्षीने होईल आणि कुणीही अस्त्र, शस्त्र, दगड किंवा इतर साहित्याचा वापर करणार नाही. लढाईत तिसरा कुणीही मध्ये येणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यावी. गायकवाड यांनी म्हटले आहे की, "वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर मला याला आव्हान आहे की तू तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही मी माझ्या धर्माचे लोकांना आणणार नाही अन तुला येडं खातच आहे तर तू एक मुला अॅपीट करून दे पोलीस महासंचलावणे की आमच्या दोघांच्या वादामधे आमचं दोघांचे काही बरं झालंय तर आम्ही याला दोघं स्वतः जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा।"