Voter List Row: '२० वर्षांपासून Congress नं नाव टाकली', Sanjay Gaikwad यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी दुबार मतदारांच्या (Duplicate Voters) मुद्द्यावरून काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला आहे, तर दुसरीकडे मनसेनेही (MNS) याच मुद्यावरून निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) मोर्चा काढला आहे. 'ही जी नावं आहेत, ही नावं वीस वर्षांपासूनची आहेत आणि त्याचा शंभर टक्के फायदा काँग्रेसला होतो,' असा थेट आरोप गायकवाड यांनी केला. स्वतःला विजयी करण्यासाठी मागच्या काळात काँग्रेसनेच ही दुबार नावं टाकली आहेत, असा दावाही त्यांनी केला. धक्कादायक उदाहरण देताना गायकवाड म्हणाले की, आमच्या बुलढाण्याच्या एका नगराध्यक्षाचं नाव मतदार यादीत चार ठिकाणी आहे. पंचवीस वर्षांपासून गाव सोडून गेलेले आणि मृत पावलेल्या लोकांची नावंही यादीत असून बोगस मतांमुळेच निवडणुकीत आपला लीड कमी झाल्याचा दावाही गायकवाड यांनी केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement