Sangram Jagtap : 'हैदराबादहून मोठं बोकडं आलं', Asaduddin Owaisi यांच्यावर पलटवार

Continues below advertisement
अहमदनगर (Ahilyanagar) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), एमआयएमचे (AIMIM) नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) आणि असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. 'एमआयएमची बोकडं आपल्या नगरमध्ये आली, एक हैदराबादहून मोठं बोकडं आलं आणि एक छत्रपती संभाजीनगरचं बोकडं आलं,' अशा शब्दात संग्राम जगताप यांनी इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. इम्तियाज जलील यांनी यापूर्वी संग्राम जगताप यांचा 'चिकणी चमेली' असा उल्लेख करत टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जगताप यांनी जलील यांच्यावर पलटवार करत, 'पहिले हर रोज एक छोटासा चिंटू वह बोलता था। अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है। तू है क्या चीज?' असा सवाल केला. या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola