Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'

Continues below advertisement

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'

अशोक खरातवरचित्रीत होत असणाऱ्या महाराष्ट्रा एल्फिन्स्टन फाईल या चित्रपटाच्या  शूटिंगमध्ये एक घोटाळा झाला आहे. अशोक खरात  सांगोला तालुक्यात येऊन पूजा करून गेला आहे. उघडे नागड्या पद्धतीने धिंगाणा घालून सांगोला येथील जवळ्याकडे पूजा केली आणि माझा भाचा असणाऱ्या अतुल पवारला निवडणुकीत पराभूत करून जीवे मारण्याची पूजा केली. मात्र, मी माझ्या भाच्याला सांगितले. तुझा मामा या महाराजाच्या बापाचा बाप आहे. तू मरत नाही, काळजी करू नको. त्यामुळे हा प्रसंग अशोक खरातवर चित्रीत होणाऱ्या चित्रपटात घेतला आहे का? असा सवाल माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिपाली सय्यद यांना केला.सांगोला येथे शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मंत्री भरत गोगावले , मंत्री योगेश कदम , दिपाली सय्यद उपस्थित होत्या. यावेळी दिपाली सय्यद यांना उद्देशून शहाजी बापू पाटील यांनी सांगोल्यातील अशोक खरातचे कारनामे सांगून माजी आमदार दीपक साळुंखे यांना टोल लगावलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola