एक्स्प्लोर
Rajaram Patil Sugar : 'कारखान्याचा धुराडा पेटवून देऊ', Gopichand Padalkar यांचा Jayant Patil यांना इशारा Special Report
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात साखर कारखान्याच्या नावावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. 'हा कारखाना सभासदांना परत दिला नाही, तर आगामी हंगामात कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही,' असा थेट इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर, 'राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना' या युनिट क्रमांक चारच्या कमानीवर अज्ञातांनी रात्रीतून 'राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना' असा फलक लावल्याने खळबळ उडाली. डफळे घराण्याच्या पुढाकाराने उभारलेला हा कारखाना नंतर लिलावात राजारामबापू पाटील गटाने विकत घेतला होता. या प्रकारानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवून घेतली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने याला राजकीय स्टंटबाजी म्हटले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















