संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना सांगली पालिका स्थलांतराच्या नोटीस देणार
दाच्या संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका अलर्ट झालीय. महापालिका प्रशासनाकडून कृष्णा नदी काठच्या पूर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या तात्काळ नोटीसा काढल्या जाणार आहेत. तसेच पूरपट्ट्यातील नागरिकांनी वेळीच स्थलांतर होण्याचे महापालिका प्रशासनाकडून नागरिकाना आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आलंय. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेकडून पुरपट्यातील नागरिकांना कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही याची खबरदारी देखील नागरिकांनी घ्यावी अशा सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेत. पावसाळा आणि संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापौराच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व नगरसेवकांसोबत घेतलेल्या बैठकीत संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आलेत. याचबरोबर पुर काळात आवश्यक औषधे, साथीचे आजार उद्भवल्यास त्याबाबत लागणारी औषधे आताच उपलब्ध करण्याच्या सूचनाही काही नगरसेवकानी प्रशासनाला केल्या आहेत.