Sangli Yellow City : सांगली होणार यलो सिटी, अनेक इमारती, शासकीय कार्यालये पिवळ्या रंगाने रंगवण्यात
Continues below advertisement
सांगलीच्या ब्रॅंडींगसाठी आता सांगलीची यलो सिटी करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. त्यामुळे आता लवकरच सांगली महापालिकेच्या अनेक इमारती, शासकीय कार्यालये आणि प्रमुख मार्गावरील दर्शनी असणाऱ्या इमारती पिवळ्या रंगाने रंगवण्यात येणार आहेत.
जगभरात सांगली जिल्ह्याची ओळख ही हळदीची सांगली अशी आहे. त्यामुळे या हळदीच्या शहराचे ब्रँडिंग करण्याच्या दृष्टीने सांगलीला हळदीप्रमाणे पिवळे करण्याचा निर्णय आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला आहे. या उपक्रमात अनेक सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतलाय. त्यामुळे जिल्ह्यात या उपक्रमाची चांगलीच चर्चा होताना दिसतेय.
Continues below advertisement