सदाभाऊंची मनधरणी करण्यात भाजपला यश, रयत क्रांती पदवीधर निवडणुकीतून माघार घेणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Nov 2020 09:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाराज असलेल्या सदाभाऊ खोत यांची मनधरणी करण्यात अखेर भाजपला यश आले आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेने माघार घेत, भाजपचे उमेदवार संग्रामसिंह संपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. सांगलीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.