Sangali Warna : वारणा नदी काठची गावं पुराच्या विळख्यात, गावांना सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement
Sangali Warna : वारणा नदी काठची गावं पुराच्या विळख्यात, गावांना सतर्कतेचा इशारा
वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा वेढा पडला असून गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगत जनावरांसहित स्थलांतरित व्हायला सुरुवात केली आहे. तसेच कणेगाव येथील मसोबा मंदिरात पाणी शिरलेय. दुसरीकडे चांदोली धरण क्षेत्रातून सतत वारणा नदी पत्रात विसर्ग वाढवण्यात येत असल्याने वारणा नदीचे पाणी पातळी आणखीन वाढत आहे. त्यामुळे वारणा नदीकाठच्या लोकांनी अधिक सतर्क राहावे असा प्रशासनाकडून सातत्याने सांगण्यात येतेय.
Continues below advertisement