Sandeep Deshpande Varun Sardesai : सेना-मनसे युतीची पहिली झलक, दोन्ही ठाकरेंचे खास मोहरे एकत्र!
Sandeep Deshpande Varun Sardesai : सेना-मनसे युतीची पहिली झलक, दोन्ही ठाकरेंचे खास मोहरे एकत्र!
गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या मिलनाची चर्चा सातत्याने होत असतानाच मराठी भाषेच्या हितासाठी आणि महाराष्ट्रातील मराठी धर्म बुलंद करण्यासाठी संयुक्त मोर्चाची हाक दिली आहे. एक दिवसांच्या अंतराने दोन मोर्चे होत असल्याने कोणताही वेगळा संदेश जाऊ नये, यासाठी दोन्ही बंधूंनी अखेर युतीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकताना 5 जुलै रोजी मोर्चा निश्चित केला आहे. त्यामुळे या निर्णयाचे मराठी माणसातून स्वागत केलं जात आहे. मात्र, हे सकारात्मक पाऊल फक्त मराठी भाषेसाठी न राहता महाराष्ट्र धर्म बुलंद करण्यासाठी दोघांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे, अशीही भावना आहे.
शिवसेना पक्षाचे दोन तुकडे होतील का?
दोन बंधूमध्ये गेल्या 18 वर्षांपासून संवाद झालेला नाही. क्वचित प्रसंग सोडल्यास दोघांनी सुद्धा एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. मात्र, आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे दोन्ही बंधूमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव कमी झाला आहे. यामध्ये साखरपेरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडूनही केली जात आहे. सामनामध्येही राज यांचे फोटो अलीकडील काळात छापून येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर 2005 मध्येही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज यांच्या बंडाची चाहुल लागताच शिवसैनिकांना उद्देशून लेख लिहित भावनिक आवाहन केलं होतं. तो दिवस होता 10 डिसेंबर 2005. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये शिवसैनिकांना उद्देशून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका स्तंभात लिहिले होते की, 'शिवसेना पक्षाचे दोन तुकडे होतील का? हे विभाजन कसे होईल? तुम्ही सर्वांनी या प्रश्नांची काळजी करणे थांबवावे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राची आणि स्वतःची काळजी करावी. आम्ही आमच्या गडाचे रक्षण करण्यास सक्षम आहोत. मी माध्यमांना सांगू इच्छितो की तुमच्या मनात जे काही आहे ते होणार नाही. शिवसेना अजिंक्य आणि अविनाशी आहे.