एक्स्प्लोर
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 14 July 2025 : ABP Majha
राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) गंभीर आरोप केले आहेत. बामसेफ (BAMCEF) आणि संभाजी ब्रिगेडला (Sambhaji Brigade) संपवण्याचा कट रचल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवण्याचे काम २०१४ पासून सुरू झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गायकवाड हल्ला प्रकरणी सखोल चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. हल्ला करणाऱ्या आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक आणि हल्ला प्रकरणी आरोपी दीपक काटे (Deepak Kate) आणि भवानेश्वर शिरगिरे (Bhavaneshwar Shirgire) यांना सोलापूर पोलिस अधीक्षकांसमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. दीपक काटेवर स्वेच्छापूर्वक दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे असे जामीनपात्र गुन्हे दाखल आहेत. बीडच्या अंबाजोगाईमध्ये गायकवाड यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करत समर्थकांनी घोषणाबाजी केली. मराठा समाजाने ग्रामीण पोलिस अधीक्षकांना निवेदन देत आरोपींना सोडल्यास अक्कलकोट बंद करण्याचा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) बारा किल्ले युनेस्कोच्या (UNESCO) वारसा यादीत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जल्लोष केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधिमंडळ परिसरात हा जल्लोष झाला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात पोलिस महासंचालकांकडे (DGP) लेखी तक्रार करण्यात आली आहे. वरळी येथील विजयी मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप तीन वकिलांनी केला आहे. महाराष्ट्रातील बारा महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) पदोन्नती मिळाली आहे. रिक्त असलेल्या जागांवर बारा नवीन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. एचआर हॉटेल संघटनांच्या (HR Hotel Associations) बंदमुळे आज राज्यभर 'ड्राय डे' (Dry Day) आहे. राज्यातले वीस हजार बार परमीट रूम (Bar Permit Room) आज बंद आहेत. महाराष्ट्रात दीड लाख कोटी रुपयांचे हॉटेल आणि तत्संबंधी व्यवसाय आहेत. रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये सीसीटीव्ही (CCTV) बसवले जाणार आहेत. गर्दीत वाढ होणे आणि महिला प्रवाशांच्या बाबतीत गैरप्रकार घटनांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महिनाभरात समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) अकरा लाख वाहनांनी नागपूर ते मुंबई प्रवास केला आहे. टोलच्या माध्यमातून ९० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत दोन कोटी चोवीस लाख वाहनांनी प्रवास केला आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर



















